आयुष्यातील रंग

Wednesday 27 February 2019

विग कमांडर अभिनंदन

.

जेवण करून रात्री झोपलं का सकाळी जाग येते तो पर्यत आपल्या ला माहीत नसतं बाहेर च्या जगात काय चालय ते
झोपेतून जाग आली आणि व्हास्ट अँप उघडून बघितल आणि त्यात एक व्हिडिओ बघितला व्हिडीओ होता भारतीय पायलट विग कमांडर अभिनंदन यांचा,
पाकिस्तान च्या स्वाडन ला प्रतीउत्तर देताना,विमान क्रॅश झालं विग कमांडर अभिनंदन यांनी शीट इजिट केलं आणि सुखरूप पणे जमिनीवर लॅन्ड केलं पण,
ते पाकिस्तान च्या भु भागावर,जगात कुठे पण जा पण पाकिस्तान मध्ये जाऊ नका असा व्हिडीओ बघितला,तेथील लोक विग कमांडर अभिनंदन याना कुर पणे वागणूक देत होते पाकिस्तान नि सेना च्या ऑफिसर अमोर त्याना लाथा बुक्या नि मारलं जात होतं,
हेच जर उलट भारतात घडलं असत तर काय झालं असत शत्रू च विमान भारतात पाडलं गेलं असत किंवा क्रॅश झालं असत असत आणि वैमानिक शीट इजिट करून आपल्या जमीवर आला असता असता तर माझ्या मते भारतातील कोणता पण भु भाग असो त्याला इतक्या कुरपणे वागणुक तरी आपल्या भागावर भेटली नसती 
हाच फरक आहे आपल्यात आणि पाकड्या मध्ये जनावरांन पेक्ष्या हीन दर्जा ची वागणूक पाकिस्तान करत आलाय आज पर्यत त्याच्या ताब्यात असलेले भारतीय कैदी किंवा चुकून loc कॉर्स झालेल्या सोबत 
विग कमांडर यांनी पाकिस्तान नि लढावू जगी जहाज याना परतून लावताना आपल्या जीवाची पर्वा न करता हल्ला करण्या साठी येणार विमान मोठया धेर्या ने परतून लावलं 
फाळणी नंतर चा जो पाकिस्तान आहे,आज पण तोच आहे हे पाकिस्तान मधून आलेल्या विग कमांडर अभिनंदन याचा व्हिडीओ सिद्ध करतोय 
पाकिस्तान हा कट्टरवादी असून त्याना माणुसकी नावाची गोस्ट अजून पर्यत तरी समजलेलेली नाहीये
 पाकिस्ताननि pm इम्रान खान मनताय now पाकिस्तान हे ये अस असेल तर विग कमांडर अभिनंदन याना दिलेली तेथील लोकांनी वागणूक हे दर्शवून देते आहेत की पाकिस्तान ने किती पण चागुलपणा चे धोग आणले तरी बात अमन की ओर बगल मे छुरा च असतो हा आज पर्यत चा अनुभव आहे भारता सोबतचा पाकिस्तान चा 
आपले विग कमांडर अभिनंदन हे लवकरात लवकर परत यावे हीच अपेक्षा देवा कडे करूयात
जय हिंद
"पायलट अभिनंदन", वाचा प्रतिलिपि वर :

Sunday 24 February 2019

सर्व साधारण आयुष्य जगत असताना त्यात खुप चागले किंवा दिवस एका एकी वाईट काळात कसे कन्व्हर्ट होतात ,
काय होत असे की चागला काळ वाईट काळात बदलून जातो
माझे मते कुठे तरी कमी पडल्या शिवाय वाईट काळ येत नाही ,
पण दुसरी बाजू अशी पण आहे की कधी कधी सर्व काही करून सुद्धा अपयश येत तेव्हा काय मानव त्या वाईट काळाला
आपल्या आयुष्यात सुख दुःख येत च असतात त्या मध्ये दुःख सर्वात जास्त असतात आणि सुखा पेक्ष्या दुःख च पचवावी लागतात सुखाचा आनंद फार थोडा असतो
वाईट काळात लोक आपल्या पासून दूर जातात त्याच जास्त मनावर नाही घेयच कारण हेच लोक पुन्हा yes मिळवल्या नंतर आपली suthti करतात तेव्हा कोणती ही अपेक्षा न ठेवता आपला काम करत राहा आपल्या आयुष्यातील वाईट काळ पण निगुण जाइल आणि परत एकदा तुमच्या चेहर्या वर हसू येईल..

Friday 22 February 2019

पुस्तक..
आपल्या आयुष्यात सर्वांत मोठा रोल कोनलाचा असतो कोणी मनेल आई वडील कोणी म्हणेल शिक्षक कोणी मनेल मित्र, प्रत्येकाचे वेगवेगळी मते आहेत ,पण आपल्या आयुष्यात सर्वात मोठा रोल हा पुस्तकाचा होऊ शकतो ,पुस्तक जर मना पासून वाचणारा असेल तर तो माणुस आपल्या आयुष्यात प्रेतक निर्णय शांत संयमाने घेत असतो ,पुस्तक हे अस रसायन आहे जे तुमच्या  नसा नसात एकदा भिनले की माणूस हा आपल्या आयुष्याला वाटेल तशी कलाटणी देऊ शकतो,
पुस्तकात दंग, असणारे माणसे खूप शांत व खूप संयमी असतात,
आपल्या आयुष्यात एक तत्व ने चालणारी माणसे आयुष्यात यशस्वी होतात ,
गांधीजी ,चाणक्य, या वक्ती ने तत्व अंगिकारले या मूळ ते या जगात जिवंतच राहणार,
पुस्तक आपल्याला एक प्रभावी वक्ती च आहे जे जस वाचाल तसे आपल्या आयुष्यात इफेक्ट करेल,
पुस्तक कोणतं पण असो ते फक्त जगणं आणि मरण या पुरतच मर्यादित नसत त्याच्या पलीकडे जाऊन ते माणूस जग सोडून जरी गेला तरी ते या विश्वात जिवंतच राहत 

"पुस्तक", वाचा प्रतिलिपि वर :
https://marathi.pratilipi.com/story/ma30io683iQt?

खाकी आणि देवदूत

खाकी आणि त्यातील देवदूत...

खाकी हा शब्द ऐकला तरी काहींच्या तोड च  पळत ...
पण तुम्ही कधी या खाकी मधील देवदूत बगतले का ........काहींनी बघितले असतील ते पण संकटाच्या काळात ,होय संकटाच्या काळात देवदूत बनणारे खाकी मधील वक्ती ,,,,,
तेही तुमच्या आमच्या सारखेच असतात त्याना पण ,घर,मुले  सर्व काही असत,पण त्याना त्याच्या घराकडे जास्त लक्ष देता येत नाही  ,कारण तर माहीत असेल ना तुमाला,होय त्याच्या वरती असलेला कामाचा प्रचंड बोज्या ,,,,,
तुमच्या आजू बाजूला जवळच एखादं पोलीस चौकी जरूर असेल कधी गेलात का तुम्ही तिथं,,आपल्या सारखेच माणसे असतात ते पण पण आपला समाज सर्वात जास्त नाव ठेवतो त्याना, रात्री अपरात्री प्रसंगी डबल ड्युटी करून आपल्या साठी काम करत असतात ,
कुठे काही पण झालं तर सर्वात आधी तेच हजर असतात,
मोर्च्या कुठे पण असो सर्वात पहिले त्याना तिथे हजर राहावं लागतं ,दंगल कुठे पण झाली तर सर्वात पहिले त्यानाच हजर राहावं लागतं,मारामाऱ्या कुठे पण झाल्या तरी तरी त्यानाच हजर राहावं लागतं,खून कुठे पण झाला तरी सर्वात आधी तेच हजर असतात,दरोडा कुठे पण पडला तरी सर्वात आधी त्यानाच आरोपीचा शोध घ्यावा लागतो,
हे सर्व करत असताना त्याना खूप मोठया मानसिक त्रास,किवा शारीरिक त्रास पण सहन करावा लागतो कारण आपल्या सारख्यना त्या वेदना नाही समजणार 
अजून खूप काही सर्व ठिकाणी आधी खाकी मधील देवदूत धावून येत असतात...

आपण आपले सण मोठया ऊसाहात साजरे करत असतो, पण त्याच्या वाटायला नेहमी ड्युटी च असते,आपले सण ,उसव आपल्या कोणत्या ही विग्ना शिवाय आपण साजरे करतो ते फक्त त्याचा मुळेच ,त्याना आपल्या आयुष्यात सण समारंभ त्याच्या वाटायला तसे फार कमी येतात .
पोलीस दलात कित्येक असे कर्तव्य निष्ठ अधिकारी आपलं आयुष्य पणाला लावून समाजात होणाऱ्या अन्यायच्या विरोधात जाऊन आपलं रक्षण करत असतात त्या सर्व ना मानाचा मुजरा ,
आपण पण खाकी चा आदर ठेऊन,त्याच्या तील देवदूत ओळखु या ......