आयुष्यातील रंग

Sunday 14 June 2020

https://www.instagram.com/deepakrav_jadhav


पाहिलं प्रेम आणि पहिला पाऊस हा खूप वेगळा असतो जितका आनंद पहिल्या प्रेमात होतो तितकाच आनंद पहिल्या पाऊसात होतो ... प्रेमातले पाहिलपन आणि पाऊसातील पाहिलेपण हे जे त्यावर प्रेम करतात त्यांनाच कळते...

पहिला पाऊस हा वादळी वाऱ्यासह असतो त्यात पडणार-या गारा वेचण्याचा आनंद काही औरच असतो"
आपण ज्या पद्धतीने मित्र-मैत्रिणी किंवा प्रियसीची किंवा नातेवाईक यांची जितकी आतुरतेने वाट बघत असतो तितकीच वाट पहिल्या पाऊसाची बघत असतो,
पहिला पाऊस अचानक पाहुणे आल्यासारखा येतो,आभाळात अचानक दाटून येणारे ते काळेकुट्ट ढग आणि त्यानंतर पक्ष्यांची घरा कडे जाणारे थवे ते दृश्य खूप मनमोहक असते, सुटलेला वारा हा झाडांच्या आकाशात घेऊन जाणाऱ्या फांद्या जणू पाऊसासाठी आमंत्रण देण्यासाठी आकाशात झेपावत असतात,झाडांची सळसळणारी पाणे जणु येणाऱ्या पाऊसाला वाद्य वाजून स्वागत करत करतात, आकाशात होणारी ढगांची दाटी आणि मधेच गडगडाटासह चमकणारी वीज खूप रोमहर्षित करून जाते, पहिल्या प्रेमात उधळणारे रंग आणि पहिल्या पाऊसात उधळणारा तो मातीचा सुगंध मनाला मंत्रमुग्ध करणारा असतो पहिला पाऊस पडून गेल्यानंतर पक्षांचा चिवचिवाट खूप अविस्मरणीय असतो,
पाऊस होऊन गेल्या नंतर पडणारा तो सात रंगांचा  इंद्रधनुष्य  मनमोहक करणार असतो,पहिला पाऊस होऊन गेल्यानंतर रात्री अंगणात बसून आकाशातील चांदण्या बघण्याची मजा काही औरच असते,पहिल्या पाऊसात कौलारू घराच्या छतावरून लागणार्‍या त्या पहिल्या "लवा"ओजळीत कायमच्या साठवुन ठेवु वाटतात....
   याच पहिल्या पाऊसाने लहानपणी च्या कित्येक आठवणी शिदोरी सारख्या बांधून ठेवलेल्या असतात,त्या कितीही पाऊस झाला तरीही वाहून जात नाही,याच पाऊसाने कित्येक कवी निर्माण केलेत याच पाऊसात कित्येकाचे मने "ओली चिंबभिजली"असतील...!