आयुष्यातील रंग

Sunday 23 September 2018

गणपती विसर्जन

गणपती विसर्जन 


मी धरणावरील एका बाजूला जाऊन निवांत उभा होतो प्रत्येक जण आपल्या लाडक्या बाप्पा ला शेवटचा निरोप देण्या साठी मोठ्या उत्साहात दिसत होतं ,अकरा दिवस मनो भावाने पूजा अर्च्या करून आज निरोप देत होत ,खूप सारी गर्दी होती,प्रत्येक जण आरती करून प्रसाद वाटत होतं एकाने माझ्या पण हातावर मोदक आणि प्रसाद वाटत होतं,मी मात्र जुन्या आठवणीत गेलो 6,7 वर्ष जुन्या आमच्या पण गणपती असायचा अगदी सहा सात डोके असाचे पण गणपती त पण शेवटच्या दिवशी गर्दी मावत नव्हती ,हुरूप पण तसच असायचा गणपती विसजना पासून अगदी दुपारी 12 पासून पासून लगबग असायची ती रात्री 10 वाजे पर्यत असायची गणपती विसर्जन होई पर्यत दिवसा गणपती कधीच नाही विसर्जित केला अमी,आप्पा, शिवा, बापू,योगेश, निवृत्ती, मी,अजून बाकी चे पण असायचे,त्या काळात खिशात पैशे नसायचे पण गणपती ची मूर्ती दर वर्षी 1 फूट मोठी असायची,आज प्रत्येक जण प्रत्येकाच्या कामात मग्न दिसले ,आठवण आली असेल की नाही त्या सर्वांना असो तो हुरूप वेगळा तो जोश वेगळा ,जितके दिवस गणपती बसवला असेल तो तितक्याच मनो भावाने बसवला...

आज त्याच ठिकाणी दूर दूर वरून लोक गणपती विसर्जित करत होते ,काहींना पाण्यात जायची भीती वाटत होती तर लांबूनच मूर्ती पाण्यात सोडून देत होते ,बगून वाईट पण वाटत होतं इतके दिवस मनो भावाने पूजा करून शेवटी मात्र मूर्ती असल्या पद्धतीने सोडत होते,कोणीतरी येऊन हळूच हातावर मोदक आणि प्रसाद देत होत ,इकडे सारे गणपती बगून मनात एक विचार येत होता बाप्पा सर्वच्या इच्या पूर्ण कश्या करणार प्रत्येक जण बाप्पा जवळ आपली मनातील इच्या पूर्ण करण्या साठी साकडं घालत असणार ,किती जणनाच्या पूर्ण करत असणार, जवळ पास सर्व हार,पूजेच साहित्य विखुरलेला दिसत होत ,आपण बाप्पा सोबत आणलेले सर्व काही पाण्यात टाकून मोकळं होत तीत कोणत्या ही प्रकारची निर्मल टाकण्यासाठी वेगळी सोय नव्हती ,म्हणून नच तिथल्या पाण्यावर सर्व काही तरंगत किनारायावर येताना दिसत होतं ,गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या,गणपती गेले गावाला चेन पडेना आमाला या आवाजात सर्व काही तल्लीन होते,
एक तास मी सर्व काही हेरत होतो कोणी बाईक वर गणपती आणत होत तर कोणी मोठ्या गाडीत ,कोणी ट्रैक्टर मध्ये मध्ये आपल्या लाडक्या बाप्पा ला शेवटचा निरोप देण्यासाठी चालले होते मी सर्व हे दूरून मोठ्या उत्साहात बगत होतो,एकाच ठिकाणी एक मोठा आणि बाकीचे छोटे गणपती ठेऊन पूजा करून त्यांना निरोप देत होते,मोठाले गणपती पाण्यात बरेच मध्ये जाऊन विसर्जित करत होते,सर्व नजारा एकदम उत्साहीत होता जसा जसा सुर्यास्त जवळ येत होता तसा तसा लोकांची बाप्पा ला निरोप देयची घाई होत चालली होती,प्रत्येक जण आपल्या बाप्पा ला पुढच्या वर्षी लवकर या असा शेवट चा निरोप देऊन आपल्या आल्या वाटाने निघत होते,आणि बाप्पा पण आपल्या सर्वना निरोप देऊन विसर्जित होत होते,

माझं मन मात्र उद्याच्या विचार होत,

कदाचित दोन दिवसांनी पाणी कमी झाल्या नंतर तिथे फक्त तुटलेल्या मूर्ती दिसणार होत्या त्या मूर्ती कडे बगून किती जणांना आपल्या घरात विराजमान असणारे बाप्पा दिसणार ,त्या तुटलेल्या विखुरलेला मूर्ती चा तो नजारा किती जण बगतील कदाचित कोणी टिकड फिरकणार पण नाही दरवषी किती तरी मूर्ती विसर्जित होतात,त्या तुटलेल्या ,विखुलेले मूर्तीकडे बगून किती लोकांना  आपण केलेली मनोभावें पूजा आठवेल, हे तर बाप्पा ला च माहीत आता,

सूर्य बुडतील गेला तस मी पण त्या ठिकाणाचा निरोप घेयच ठरवलं,मन मात्र काही जुन्या काही ताज्या आठवणीत हरवून गेलं होतं...!

इतकं मात्र खरं तेच बाप्पा पुढच्या वर्षी पण तितक्याच जोशात येणार हे मात्र नकी..............!
DJ बाबु....

Friday 14 September 2018

द से,

द से दीपक भी
द से दर्द भी 
द से दिल भी,
द से दिवाना भी,
द से दौलत भी,
द से दुवा भी,
द से दोस्ती भी,
द से दुरी भी,
द से दस्त भी,
द से दिमाक भी,
ओर द से dj बाबू भी,

Sunday 9 September 2018

पोळा

उद्या सर्जा च्या सण हाय त्याचा मी गुमान मोबाईल मधील आपलं डोकं उचकवल आणि घरात जाऊन वाटीत तेल घेऊन आलो आणि माय वाला सर्जा च्या शिंगाला लावायला गेलो ......
तेवढयात या मालक या मालक असा आवाज आला मी दचकलो ...पुढच्या शणी इकडे तिकडे बगू लागलो पण आजू बाजूंला गोठयात असलेल्या बैल आणि गाई शिवाय कोणी दिसेना मी चपापलो परत तिकडे टिकडे नजर टाकली पण कोणी दिसेना कोणी आवाज दिला काही कळेना मला ,तो पर्यत परत दुसरयदा आवाज आला ,मालक ,मालक आणि माझं लक्ष्य माझ्या सर्जा कडे गेलं मी काही तरी बोलणार तोच त्यांन मान  डोलवली तस मी तेंच्या पाशी जाऊन उभा राहलो ,माझ्या हातातील वाटी त असलेलं तेल बगून माझ्या सर्जा ला कळून चुकलं उद्या सण आहे तसा तो एकदम जवळ येऊन उभा राहिला मी तेंच्या मानेला असलेली पोळी चोळत बोलो तुला बोलता कस येत ,तो लगेच बोला अहो मालक आपलं जल्म पासून च आपलं नात मला तुमच्याशी तरी बोलणं अवगड नाही काही ,मी पण मान हलवत त्याच्या उतरला प्रतिसाद दिला ।मी माझ्या हातातील वाटी वरती करत त्याला मटल सर्जा सरळ उभा राजा शिंगे हलवू नकोस तेल लावतो तुझ्या शिंगाना तस तो निमूट पणे उभा राहिला,मी माझ्या हाताने सर्जा च्या शिंगणा तेल लावत होतो पण विचार मात्र दुसरीकडे च होता त्यानं ते हरेल आणि छोट्या आवाजात पुट पुटत  तो बोलला,मालक तुमचं आज लक्ष्य दुसरीकडे च दिसतंय ,तस मी चबाबलो आणि बोलून पडलो अब" ना रे कसलं काय हे काय शिंगणा तेल लावतोय ते ,तो परत बोलतां झाला,मालक आज पासून थोडी ओळखतो व्हय तुमाला 5 वरीस झाले आता मला या गोठयात दर वर्षीचा पोळा आठवतोय मला ,मी परत त्याला उत्तर देऊन मोकळा झालो नाही रे  सर्जा काही बस असच ,...............।
मी तेंच्या बोलण्या कडे दुर्लक्ष् करत पुट पुटलो .......
तो पर्यत एक शिंगाला तेल लावून झाल होत दुसऱ्या शिंगाला तेल लावला लागणार तितकायत परत सर्जा च्या तोडून शब्द निघाले ..मालक ....
हा बोल सर्जा काय मणतोस मी लगेच पुट पुटलो
तो ,मालक ते ........
हा बोल सर्जा काय ते ......
मालक एवढे दिस झाले आता या गोठयात आहे मी पण मला माझी नवीन मालकीचया हाताने पुरण पोळी कधी भेटणार खायला .....
मी,तस मी हातातील वाटी खाली ठेवत तेंच्या मानेला घट मिठी मारली आणि माझ्या डोळयातून तपकन तक थेंम पडला ...त्यांन तो हेरला आणि बोलता झाला मालक काय झालं मी तर माझ्या मालकीनीच्या हातची पुरणाची पोळी कधी भेटलं मणून बोलून गेलो...माझ्या डोळातील पाणी बगून तो जरा शांत झाला,मी त्याच्या प्रश्नच उत्तर टाळत पुन्हा तेंच्या राहिलेलं शिंगाला तेल चोळत राहिलो  तो पर्यत सूर्य मावतील गेला होता,मी माझं काम  उरकुन सर्जा ला मटलो चल आता बोलू उदयाला ला सण हाय उद्या थोडी राहिली तेवढी तयारी करतो तुझी अस  बोलून मी घरात  निघून गेलो ..... घरात जाऊन मी त्याच्याकडे पुन्हा एक नजर टाकली तो शान्त पणे उभा होता त्याच्या न दिलेल्या प्रश्नाचं उत्तर ला .......मी घरात गेलो आणि माझ्या डोक्यात विचाराचं वादळ उठल होत ...मी हात धुतले आणि जेवायला गेलो पण आज भूक काही नव्हती मी तासच रिटन झालो आपल्या बिछानवर येऊन गुपचिप पडलो विचाराच्या या वादळात कधी झोप लागून गेली मला पण नाही समजलं ...............
दुसऱ्या दिवशी बरोबर दरोज च्या टाईमाला जाग आली,मी ताडकन उठलो,आणि गोठ्याकडे गेलो ,सर्जा शांत पणे डोळे झाकून रवंथ करत होता मी परत अथुरणात येऊन पडलो .....
सकाळी अगोळ करून सर्जा ला वैरण कडी टाकली आणि माझ्या कामात निघून गेलो ..............
बा..अरे ते सर्जा चे शिंगे कोण साळणार तस मी हातात ला काम टाकून सर्जा पाशी गेलो,
सर्जा उभा राहा नीट अजिबात हालचाल नको शिंगे सळतो तो तसा चुपचाप उभा झाला,मी माझं काम सुरू केलं तोच,त्यानं रात्रीचाच प्रश्न उकरून काढला ...
मालक घरी नवी मालकीण कडी आणणार ..
मी त्याचे शिंगे साळत बोलता झालो अरे आपण गरीब माणसे आपल्या नशिबात नाही कोणी मालकीण ...
सर्जा परत बोला अस कस नाही ,
नाही कोणी मालकीण बस परत नको डोकं लावू आता मला मी सन्तापलेल्या स्वरात मटलो तसा तो शांत झाला ,
मग मीच बोलत्या स्वरात मटलो आर आपल्या कड नाही डिग्री, ना  नोकरी,ना आपल्या कडे पैसाना ना गाडी,आपण तर गरीब माणस हाय र सर्जा आपल्या ला आपला जीव पोसायला महाग आहे कुठे परत अजून दुखणं करून घेतो तसा सर्जा बोलला मालक मालक आपण लय कस्ट करू
मी परत उत्तर देत बोलो आर सर्जा आता दिस बदलेल त आता पहिल्या सारख थोडी राहील का पाहिले ज्याच्या दावणीला जास्त बैल तो गावचा मोठा माणूस असायचा आता कस्ट करायला नाही किंमत राहिली आता,कोणत्या भी गावात गेलं की बोटावर मोजण्या इतके बैल असता गावात अन किती कस्ट करणार आहे र तू आज काल केलेलं कस्ट पण नाही फिट्त अशी झालीय शेती ची व्यथा कोणतं पण पीक केलं का खर्च निघत नाही मग त्या कस्ट भी फिट्टत नाही आणि आता पोरीं ना पण शेतकरी मुलगा नको असतो पोरीच्या अपेक्ष्या खूप मोठ्या झालायत त्याना जन्मींन जागा,गाडी ,बंगला,पैसा पाहिजे ना आपल्या कड काय हाय..... आपण नुसतं कस्ट करून मारतोय तू आवताला जुंपून आणि मी शेतीत तच मारणार हाय आपल्या ला नसता स्वप्न आपण फक्त कस्ट करायचे बस ,.......माझ्या तोंडचे शब्द ऐकून तो शांत झाला....आणि बोलता झाला ...
मालक आता किती दिस राहिले माझे तरी अजून दातांन चावतय तोवर करेल कस्ट एकदा माझी चालायची व गवत चावायची ताकद संपली की मी पण। तुमाला भारच होईल की ,,,
मी भरल्या आवाजात मटलो आर सर्जा आर तूझा कसला आलाय भार मला तू हायस मुणून तर माझं औत चालत ना माझ्या शेत तुझ्या मूळच हिरवं गार होत ना तुझा मला कसला आलाय भार,,
मी तोवर सर्जा ला हौदवर घेऊन गेलो एक तास अगोळ घातली आज त्याला....
मी आपल आता सर्जा ला सजवनायत मग्न झालो होतो ...
पण मन मात्र दुसरी कडेच होत आज पण डोकायत विचारच काहूर माझल होत नुसतं सर्जा न नकळत माझ्या आयुष्यातील घडल्या गोष्टी नकळत वर आल्या होत्या त्याला काय सांगणार तुझ्या मालक च्यापण आयुष्यात खूप मोठं वादळ येऊन गेल,आयुष्यातील परीक्षेत तोय नापास झालाया ,...........
मी आपलं सर्जा ला सजविण्यात मग्न च होतो शिंगाना हिगुल लावून बेगड लावलं होत, डोकावर नवीन मातुटी लावली होती नाकात नवीन यसन घातली होती गळ्यात त्याच्या आवडते गुंगर बांधले होते ,पाठीवर रंग बेरंगी कलर लावले होते आत्ता मात्र सर्जा सजून तयार झाला होता नवीन काढणी लावून मी त्याला दावणीला बांधला .....!

सर्जा ला सजून झाल न त्याला मी मिठीच मारली तो बी शांत उभा होता 
आता मारुतीच्या देवळात जायचा time झाला होता मी नारळ घेतलं आणि देवळाकडे निगालो तीत जाऊन सर्जा ला मारुती च्या समोर सलामी दिली आणि नारळ फोडून देवळाला गरका मारला सर्जा आज खुश होता त्याच्या चाली वरूनच तास दिसत होत....
सूर्य भी मावळतीला गेला होता होता तस मी घरचा रस्ता धरला .....
घरी आलो अन घरासमोर पण सलामी दिली सर्जा न  समद्या समोर मग आई ने अन काकू न सर्जा ला ओवाळून पूर्णाच्या पोळी न निवद दिला सर्जा न पुरण पोळी खाली मला भी आई न अन काकू न ओवाळूल  .....
सर्जा आज खुश होता वर्षातुन येणार त्याच्या एकच सण  त्याच्या परिन जोरात झाला होता.....