आयुष्यातील रंग
आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक चढउताराचे लेखन
आयुष्यातील रंग
Monday, 23 August 2021
Friday, 1 January 2021
दृष्टी,
एदुर्योधनला मुभा असताना सैन्य किंवा कृष्ण दोघांतील एक निवडायच असताना त्याने सैन्याची मागणी केली,,कृष्ण ची नाही,,,,
बरोबर आहे ते म्हणतात ना मानस ओळखायला पण दृष्टी लागते ,,आणि ती फक्त अर्जुनाकडे च होती,,,,,
Sunday, 27 December 2020
Monday, 24 August 2020
Friday, 24 July 2020
..क्रिकेट
करोडो लोकांच्या मनावर अधिराज्य करणारा करणारा खेळ"
याच खेळात कित्येक खेळाडू होऊन गेलेत. प्रत्येकाचं योगदान मोठा या खेळासाठी. त्या त्यातील एक खेळाडू म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर क्रिकेट विश्वातील जवळजवळ प्रत्येक रेकॉर्ड सचिन तेंडुलकरच्या नावावर आहेत.शतकाचे महा शतकापर्यंत खूप मोठे रेकॉर्ड सचिन तेंडुलकरच्या नावावर आहेत. त्या यशामागील मेहनत पण तितकीच महत्त्वाची आहे. आणि अपयश पण तितकाच महत्त्वाचा आहे सचिन तेंडुलकर आपल्या क्रिकेट कारकिर्दीत मध्ये तब्बल 39 वेळा आउट नसतानाही अंपायर द्वारा आउट दिले गेलेले आहेत.पण कधीच अंपायर सोबत भांडण नाही की एक शब्द सुद्धा न बोलता सचिन प्रत्येक वेळी ग्राउंड सोडत असे.कदाचित याच कारणाने सचिन महान खेळाडु होऊ शकला..
आयुष्य जगत असताना आपण किती बरोबर आहे पण..डिसीजन देणाऱ्या हंपायरचा निर्णय चुकला असेल तर त्याची किंमत काय असते हे फक्त त्या महान खेळाडू ना माहीत असते जे चुक नसताना किंवा out नसताना ही out दिले गेलेलं आहेत ...
आपलं आयुष्य पण असच असत आपण आयुष्य जगत असताना आपण बरोबर असतो पण पण जर डिसीजन देणाऱ्या हंपायर न जर निर्णयच चुक दिलेला असेल तर मग त्या पुढे कोणतंच लॉजिक काम करत नसत
आयुष्य जगत असताना आपण किती बरोबर आहे पण..डिसीजन देणाऱ्या हंपायरचा निर्णय चुकला असेल तर त्याची किंमत काय असते हे फक्त त्या महान खेळाडू ना माहीत असते जे चुक नसताना किंवा out नसताना ही out दिले गेलेलं आहेत ...
आपलं आयुष्य पण असच असत आपण आयुष्य जगत असताना आपण बरोबर असतो पण पण जर डिसीजन देणाऱ्या हंपायर न जर निर्णयच चुक दिलेला असेल तर मग त्या पुढे कोणतंच लॉजिक काम करत नसत
मला कोणी तरी विचारल होत की आयुष्यात जर एकाद्या महान वक्ती प्रश्न विचारण्याची संधी तुम्हाला भेटली तर तो वक्ती कोण असेल आणि त्याला काय प्रश्न विचारावर ?
त्यावर माझं उत्तर एकच असेन " मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि प्रश्न तर तो हाच असेल की क्रिकेट कार कीर्ती मध्ये 39 वेळा out दिल गेलं त्या बद्दल तुम्हाला काय वाटत ??
Thursday, 2 July 2020
पंढरीची वारी...!
वारी: एक अविस्मरणीय अनुभव (अनुभव लेखन)*
*शब्दांकन:- दिपक जाधव*
"वाट ती चालावी पंढरीची"
"वारी हा असा सोहळा"आहे जिथे कोणालाच आमंत्रण देण्याची गरज नसते" पावसाळा सुरू झाला की"आषाढी च प्रत्येक "वारकऱ्यांला वेड लागत ते पंढरपूर च्या विठुरायाच"
"वारकरी हा जगातीलअसा संप्रदाय आहे जिथे जगातील प्रत्येक जातीचे प्रत्येक धर्माचे लोक बघायला भेटतील"
"आषाढात होणारा हा अभूतपूर्व सोहळा अभुतपुर्व असाच असतो
"संत ज्ञानेश्वर,संत तुकाराम,निवृत्तीनाथ महाराज यान सारख्या अनेक संतांच्या अनेक पालख्या पंढपुर ला मार्गस्थ होतात,त्या पालख्यांसोबत असंख्य वारकरी हातात टाळ वीणा घेऊन भक्ती भावाने कित्येक दिवस पाई प्रवास करूनही अगदी न थकता पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनासाठी भक्तिमय वातावरणात,विठुरायाच्या भजनात तल्लीन होऊन चालत असतात.
त्यात मी अनुभवलेली वारी म्हणजे श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांचा पालखी प्रस्थान सोहळा, ज्ञानोबा माऊलींचे थोरले बंधू आणि वारकरी संप्रदायाचे आद्य गुरु म्हणून त्यांची ओळख आहे निवृत्तीनाथ महाराज च्या संजीवन समाधी मंदिरातून पालखी सोहळ्याचे प्रस्थान होते पवित्र कुशावर्त तीर्थावर पूजा विधी होतो या सोहळ्यासाठी आजूबाजूच्या सर्वच क्षेत्रातून सर्व वारकरी बंधु अगदी मोठ्या उत्साहाने उपस्थित होतात, हजारोच्या संख्येने आलेले हे वारकरी मोठ्या भक्तिभावाने आलेले असतात प्रत्येकाला तिथुन निघाल्यानंतर आस फक्त एकच असते पंढरीच्या विठुरायाची.....
पालखी प्रस्थान झाल्यानंतर पुढील नियोजन सुद्धा खूप पद्धतशीरपणे केलेले असते त्यात वारकऱ्यांचे जेवण पुढील मुक्काम सर्वकाही ठरलेल्या पद्धतीने होत असते शेकडो किलोमीटर पायी चालत असताना प्रत्येक वारकऱ्याच्या हातात टाळ आणि मुखात पंढरीच्या विठूरायाचं स्मरण असतं अगदी शेकडो किलोमीटर पायी चालून सुद्धा कोणत्याही वारकऱ्याच्या चेहऱ्यावर थकवा नसतो, या वारीमध्ये तरुण वर्ग खूप मोठ्या संख्येने सहभागी होतात.......
वारीमध्ये सर्वात जास्त महत्व "रिंगण सोहळ्याला" ला असते. शेकडो किलोमीटर पायी चालत असताना थोडाफार थकवा येतो तो थकवा या रिंगण सोहळ्यामध्ये पुर्णपणे नाहीसा होतो माऊलींच्या अश्वाचे रिंगण खूप ऊर्जा देणारे असते टाळ मृदुंग आणि ज्ञानबा तुकाराम घोषा मध्ये पूर्ण परिसर भक्तीमय होऊन जातो रिंगण सोहळा अविस्मरणीय असतो सोहळा झाल्यानंतर ठरलेल्या ठिकाणी पालखीचा मुक्काम असतो प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम असतो आणि मग महाप्रसाद असतो महाप्रसाद झाल्यानंतर वारकरी रात्री विश्रांती घेतात, दुसऱ्या दिवसाची दिनक्रिया सुरु होते आंघोळ करून काकड आरती व हरिपाठ घेऊन दुसऱ्या दिवसाची अगदी भक्तिमय वातावरणात सुरुवात होते आणि नंतर महाराजांच्या पालखी पुढे मार्गस्थ होतात व सर्व पालख्या पंढरपुरात येतात .........
पंढरपुरात आल्यानंतर सर्व वारकर्यांना वेड असते ते फक्त विठू माऊली च्या दर्शनाचे आषाढी एकादशीच्या दिवशी उपवास करून चंद्रभागेमध्ये स्नान करून सर्व वारकरी भक्तीभावाने विठुरायाचे दर्शन घेतात शेकडो किलोमीटर व कित्येक दिवस पायी चालून आल्यानंतर विठुरायाचे दर्शन घेतल्यावर चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत असतो दर्शन झाल्यानंतर वारकरी हे परत आपापल्या गावी प्रस्थान करतात असाहा सोहळा अविस्मरणीय असतो...आपल्या आयुष्यात पंढरीची वारी ही प्रत्येकाने एकदा तरी नक्की करावी
जय हरी
https://www.instagram.com/deepakrav_jadhav
Subscribe to:
Posts (Atom)
-
उद्या सर्जा च्या सण हाय त्याचा मी गुमान मोबाईल मधील आपलं डोकं उचकवल आणि घरात जाऊन वाटीत तेल घेऊन आलो आणि माय वाला सर्जा च्या शिंगाला लावायल...
-
आपण आपलं आयुष्य एकट कधीच नाही काढू शकत आपल्या आपल्या आयुष्यात एक hmsafarएक अशी वक्ती हवी असते की जी आपल्या आयुष्य च्या शेवटच्या स्वास असे...