आयुष्यातील रंग

Saturday, 8 September 2018

पोळा


उद्या सर्जा च्या सण हाय त्याचा मी गुमान मोबाईल मधील आपलं डोकं उचकवल आणि घरात जाऊन वाटीत तेल घेऊन आलो आणि माय वाला सर्जा च्या शिंगाला लावायला गेलो ......
तेवढयात या मालक या मालक असा आवाज आला मी दचकलो ...पुढच्या शणी इकडे तिकडे बगू लागलो पण आजू बाजूंला गोठयात असलेल्या बैल आणि गाई शिवाय कोणी दिसेना मी चपापलो परत तिकडे टिकडे नजर टाकली पण कोणी दिसेना कोणी आवाज दिला काही कळेना मला ,तो पर्यत परत दुसरयदा आवाज आला ,मालक ,मालक आणि माझं लक्ष्य माझ्या सर्जा कडे गेलं मी काही तरी बोलणार तोच त्यांन मान  डोलवली तस मी तेंच्या पाशी जाऊन उभा राहलो ,माझ्या हातातील वाटी त असलेलं तेल बगून माझ्या सर्जा ला कळून चुकलं उद्या सण आहे तसा तो एकदम जवळ येऊन उभा राहिला मी तेंच्या मानेला असलेली पोळी चोळत बोलो तुला बोलता कस येत ,तो लगेच बोला अहो मालक आपलं जल्म पासून च आपलं नात मला तुमच्याशी तरी बोलणं अवगड नाही काही ,मी पण मान हलवत त्याच्या उतरला प्रतिसाद दिला ।मी माझ्या हातातील वाटी वरती करत त्याला मटल सर्जा सरळ उभा राजा शिंगे हलवू नकोस तेल लावतो तुझ्या शिंगाना तस तो निमूट पणे उभा राहिला,मी माझ्या हाताने सर्जा च्या शिंगणा तेल लावत होतो पण विचार मात्र दुसरीकडे च होता त्यानं ते हरेल आणि छोट्या आवाजात पुट पुटत  तो बोलला,मालक तुमचं आज लक्ष्य दुसरीकडे च दिसतंय ,तस मी चबाबलो आणि बोलून पडलो अब" ना रे कसलं काय हे काय शिंगणा तेल लावतोय ते ,तो परत बोलतां झाला,मालक आज पासून थोडी ओळखतो व्हय तुमाला 5 वरीस झाले आता मला या गोठयात दर वर्षीचा पोळा आठवतोय मला ,मी परत त्याला उत्तर देऊन मोकळा झालो नाही रे  सर्जा काही बस असच ,...............।
मी तेंच्या बोलण्या कडे दुर्लक्ष् करत पुट पुटलो .......
तो पर्यत एक शिंगाला तेल लावून झाल होत दुसऱ्या शिंगाला तेल लावला लागणार तितकायत परत सर्जा च्या तोडून शब्द निघाले ..मालक ....
हा बोल सर्जा काय मणतोस मी लगेच पुट पुटलो
तो ,मालक ते ........
हा बोल सर्जा काय ते ......
मालक एवढे दिस झाले आता या गोठयात आहे मी पण मला माझी नवीन मालकीचया हाताने पुरण पोळी कधी भेटणार खायला .....
मी,तस मी हातातील वाटी खाली ठेवत तेंच्या मानेला घट मिठी मारली आणि माझ्या डोळयातून तपकन तक थेंम पडला ...त्यांन तो हेरला आणि बोलता झाला मालक काय झालं मी तर माझ्या मालकीनीच्या हातची पुरणाची पोळी कधी भेटलं मणून बोलून गेलो...माझ्या डोळातील पाणी बगून तो जरा शांत झाला,मी त्याच्या प्रश्नच उत्तर टाळत पुन्हा तेंच्या राहिलेलं शिंगाला तेल चोळत राहिलो  तो पर्यत सूर्य मावतील गेला होता,मी माझं काम  उरकुन सर्जा ला मटलो चल आता बोलू उदयाला ला सण हाय उद्या थोडी राहिली तेवढी तयारी करतो तुझी अस  बोलून मी घरात  निघून गेलो ..... घरात जाऊन मी त्याच्याकडे पुन्हा एक नजर टाकली तो शान्त पणे उभा होता त्याच्या न दिलेल्या प्रश्नाचं उत्तर ला .......मी घरात गेलो आणि माझ्या डोक्यात विचाराचं वादळ उठल होत ...मी हात धुतले आणि जेवायला गेलो पण आज भूक काही नव्हती मी तासच रिटन झालो आपल्या बिछानवर येऊन गुपचिप पडलो विचाराच्या या वादळात कधी झोप लागून गेली मला पण नाही समजलं ...............

No comments:

Post a Comment