आयुष्यातील रंग

Tuesday 2 October 2018

अहिवत गड

अहिवंत गड एक जबरदस्त अनुभव

सप्तशुगी गडाच्या पश्चिमेला असणारा हा गड खालून इतकासच दिसतो पण जेव्हा सर कायची वेळ येते तेव्हा अवाढव्य असा हा गड,
सर्वात वरच्या बुंधा जवळ जाण आता तरी सोपं नाही राहिल 
चढण्या साठी आम्ही उत्तर पश्चिम बाजू निवडली ती सोपी होती 
जवळ जवळ 4,5 km चा रणकापत कापत अगदी त्या गडा जवळ पोहोचलो पण लांबूनच बगून अंगावर काटा आला जो सर्वात वरच्या भाग आहे तो सर करण्या साठी एकच मार्ग होता आणि तो इतका बिकट होता की दोनी साईट ने खोल दरी 4000 हजार फूट खोल आणि वरती चढण्या साठी अर्ध्या फुटाच्या उंच पायऱ्या 4000 फूट उंच आसणारा हा गड या रांगेतील सर्वात उंच आहे शेवटचा टप्पा सर करणे इतकं सोपं काम नाही हे आमच्या लक्षात चागल्या पैकी आलं ,आता च्या परिस्तिथी त दोर खंड असल्या शिवाय तरी शक्य नाही अर्ध्या फुटाच्या पायऱ्या त्या पण वरच्या साईट न ढिसाळ वरती पण तुटलेल्या आणि खालच्या साईट ने पण तुटलेल्या मधेच तेवढ्या जिवंत होत्या अगदी शेवट च्या टोकावर जाऊन आमला माघार घेव्ही लागली नारळाच्या वरच्या शेंडी सारखा दिसणारा व दोनी बाजूने 4000 फूट खोल दरी असणारा हा गड थरारक अनुभव देणारा आहे
आणि जो पण सर करेल त्याने स्वतः सेफी काढून आणावी तरच मानू आम्ही तरी...
सुरवातीला आम्ही आठम्ब (नांदुरी पासून थोडं पुढे)जवळ जाऊन वीर गळ बघितली 6 विरगळ होत्या त्यातील 4 मोठया होत्या वर गळ म्हणजे पूवी युद्धात वर मरण आलेल्या शुराची जागा ज्या ठिकाणी वर मरण आलं  ती जागा त्या वरील नक्षी सांगत असते की या शूर वीराला कस मरण आल ते ,
नंतर गड सर करायचं ठरवलं 4 तास हवे त्या साठी भर उन्हात अवघड आहे त्यात पाण्याची काही सोय नाही वरती,
नंतर पुढे आठम्ब च्या पुढे मध्ये एक रस्ता जातो तो कनेरगडा कडे जातो त्या रस्त्याने पुढे गेल का सप्तशुगी देवी च्या आणि मार्तंड ऋषी च्या मधोमध एक पुरातन शिव मंदिर आहे जून आहे खूप आणि ते जीर्ण झालंय आता खूप बाहेरून मोडकळीस आलेलं ते मंदिर मात्र गाभाऱ्यात गेल्या नंतर मनाला खूप मोठं समाधान देऊन जात,,ते मंदिर सप्तशुगी गड आहे त्याच्या पूर्वेस आहे गडाचा जो पिकनिक पॉईंट आहे त्याच्या पूर्व बाजूस खाली ,,



http://Www.mavala.in