आयुष्यातील रंग

Sunday 23 September 2018

गणपती विसर्जन

गणपती विसर्जन 


मी धरणावरील एका बाजूला जाऊन निवांत उभा होतो प्रत्येक जण आपल्या लाडक्या बाप्पा ला शेवटचा निरोप देण्या साठी मोठ्या उत्साहात दिसत होतं ,अकरा दिवस मनो भावाने पूजा अर्च्या करून आज निरोप देत होत ,खूप सारी गर्दी होती,प्रत्येक जण आरती करून प्रसाद वाटत होतं एकाने माझ्या पण हातावर मोदक आणि प्रसाद वाटत होतं,मी मात्र जुन्या आठवणीत गेलो 6,7 वर्ष जुन्या आमच्या पण गणपती असायचा अगदी सहा सात डोके असाचे पण गणपती त पण शेवटच्या दिवशी गर्दी मावत नव्हती ,हुरूप पण तसच असायचा गणपती विसजना पासून अगदी दुपारी 12 पासून पासून लगबग असायची ती रात्री 10 वाजे पर्यत असायची गणपती विसर्जन होई पर्यत दिवसा गणपती कधीच नाही विसर्जित केला अमी,आप्पा, शिवा, बापू,योगेश, निवृत्ती, मी,अजून बाकी चे पण असायचे,त्या काळात खिशात पैशे नसायचे पण गणपती ची मूर्ती दर वर्षी 1 फूट मोठी असायची,आज प्रत्येक जण प्रत्येकाच्या कामात मग्न दिसले ,आठवण आली असेल की नाही त्या सर्वांना असो तो हुरूप वेगळा तो जोश वेगळा ,जितके दिवस गणपती बसवला असेल तो तितक्याच मनो भावाने बसवला...

आज त्याच ठिकाणी दूर दूर वरून लोक गणपती विसर्जित करत होते ,काहींना पाण्यात जायची भीती वाटत होती तर लांबूनच मूर्ती पाण्यात सोडून देत होते ,बगून वाईट पण वाटत होतं इतके दिवस मनो भावाने पूजा करून शेवटी मात्र मूर्ती असल्या पद्धतीने सोडत होते,कोणीतरी येऊन हळूच हातावर मोदक आणि प्रसाद देत होत ,इकडे सारे गणपती बगून मनात एक विचार येत होता बाप्पा सर्वच्या इच्या पूर्ण कश्या करणार प्रत्येक जण बाप्पा जवळ आपली मनातील इच्या पूर्ण करण्या साठी साकडं घालत असणार ,किती जणनाच्या पूर्ण करत असणार, जवळ पास सर्व हार,पूजेच साहित्य विखुरलेला दिसत होत ,आपण बाप्पा सोबत आणलेले सर्व काही पाण्यात टाकून मोकळं होत तीत कोणत्या ही प्रकारची निर्मल टाकण्यासाठी वेगळी सोय नव्हती ,म्हणून नच तिथल्या पाण्यावर सर्व काही तरंगत किनारायावर येताना दिसत होतं ,गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या,गणपती गेले गावाला चेन पडेना आमाला या आवाजात सर्व काही तल्लीन होते,
एक तास मी सर्व काही हेरत होतो कोणी बाईक वर गणपती आणत होत तर कोणी मोठ्या गाडीत ,कोणी ट्रैक्टर मध्ये मध्ये आपल्या लाडक्या बाप्पा ला शेवटचा निरोप देण्यासाठी चालले होते मी सर्व हे दूरून मोठ्या उत्साहात बगत होतो,एकाच ठिकाणी एक मोठा आणि बाकीचे छोटे गणपती ठेऊन पूजा करून त्यांना निरोप देत होते,मोठाले गणपती पाण्यात बरेच मध्ये जाऊन विसर्जित करत होते,सर्व नजारा एकदम उत्साहीत होता जसा जसा सुर्यास्त जवळ येत होता तसा तसा लोकांची बाप्पा ला निरोप देयची घाई होत चालली होती,प्रत्येक जण आपल्या बाप्पा ला पुढच्या वर्षी लवकर या असा शेवट चा निरोप देऊन आपल्या आल्या वाटाने निघत होते,आणि बाप्पा पण आपल्या सर्वना निरोप देऊन विसर्जित होत होते,

माझं मन मात्र उद्याच्या विचार होत,

कदाचित दोन दिवसांनी पाणी कमी झाल्या नंतर तिथे फक्त तुटलेल्या मूर्ती दिसणार होत्या त्या मूर्ती कडे बगून किती जणांना आपल्या घरात विराजमान असणारे बाप्पा दिसणार ,त्या तुटलेल्या विखुरलेला मूर्ती चा तो नजारा किती जण बगतील कदाचित कोणी टिकड फिरकणार पण नाही दरवषी किती तरी मूर्ती विसर्जित होतात,त्या तुटलेल्या ,विखुलेले मूर्तीकडे बगून किती लोकांना  आपण केलेली मनोभावें पूजा आठवेल, हे तर बाप्पा ला च माहीत आता,

सूर्य बुडतील गेला तस मी पण त्या ठिकाणाचा निरोप घेयच ठरवलं,मन मात्र काही जुन्या काही ताज्या आठवणीत हरवून गेलं होतं...!

इतकं मात्र खरं तेच बाप्पा पुढच्या वर्षी पण तितक्याच जोशात येणार हे मात्र नकी..............!
DJ बाबु....

No comments:

Post a Comment