छत्रपती शिवराय आणि मावळे जेंव्हा पण किल्ला जिंकत असत तेव्हा त्या किल्यावर गवताच्या गंजीचा पेटून मोठा धूर केला जात असत त्या मागचं कारण अस की गडावर धूर दिसला की दुसऱ्या गडावरील लोकांना हा इशारा असे की मावळे आणि महाराजांनी गड जिकलाय ,हे त्या काळी इशारा किंवा एखादी घटना घडलीय हे दर्शविण्या साठी वापरत आशा कृती करत असत जवळपास छत्रपती शिवराय याचा काळ उलटून 350 वर्ष होऊन गेली आहेत,तो काळ आणि आता आहे हा काळ यात खूप फरक आहे तो असा की 100किलो मीटर लांबून गडा वरून केलेला धूर स्पस्ट दिसत असत कारण त्या काळी आता सारखी औदयोगिक वसाहती नव्हत्या ज्यातून हजारो टन कार्बन सोडला जात आहे,आज कोरोना मुळे देशात लॉक डाऊन होऊन जवळ जवळ 17 वा दिवस आहे आणि या काळात जीवना आवश्यक गोष्टी वेगळ्या तर सर्व काही बंद आहे मग त्यात कारखाने आलेत किंवा वाहन इतर छोटे मोठे उदयोग पण ,आज लॉक डाऊन चा 17वा दिवस आहे आणि येणारा प्रत्येक दिवस सुंदर आणि स्वच्छ हवा घेऊन येत आहे,हवेतील धूळ आणि कार्बन यांचं प्रमाण खूपच कमी झाल्या मुळे दूरवरुन दिसणारे डोगर पण आता स्पष्ट दिसत आहे आमच्या घरा पासून दिसणारा वणी च्या डोगरापासून मार्तंड रावळ्या जावळ्या, पासून तेचांदवड पर्यत सर्व काही डोगर स्पष्ट दिसतायत ,हे सर्व किल्ले किंवा गड फक्त पावसाळ्यात तच पाऊस पडून गेल्या नंतर एवढे स्पष्ट दिसतात एरव्ही मात्र धूळ,होणारे प्रचंड प्रदूषण या मुळे दिसत नाही ,,,,
आज घरात बसलो असताना समोर जेव्हा देवी च्या डोगर स्पष्ट दिसत होता तेव्हा मनात छत्रपती शिवरायांनी वापरलेली युक्ती आठवली जी किल्ला जिकल्या नंतर मावळे करत असे ,गवताच्या गंजी चा धूर "जो कित्येक मैल दूर दिसत असे त्या भरून त्या काळात किती हवा शुद्ध आणि गड खूप दूरदूर पर्यत स्पष्ट दिसत असे हे समजते ....…."निसर्ग आणि आपण", वाचा प्रतिलिपि वर :
https://marathi.pratilipi.com/story/0fyukahbzgbc?utm_source=android&utm_campaign=content_share
No comments:
Post a Comment