आयुष्यातील रंग

Thursday 13 December 2018

अघोरी प्रथा

#गळ

जवळ पास 1900 व शतक संपुन आता18 वर्ष उलटून गेलीत ,आपल्या समाजात अनेक प्रकार च्या चालीरीती, पद्धती आहेत नवस,गळ,काही अघोरी प्रकार बाबा लोकांकडून केले जातात,
आपल्या शरीराला अनेक वेदना देऊन काही पद्धती द्यारे नवस फेडण्याची एक पद्धत आहे गळ,

लहान पणा पासून नाव ऐकत आलोय आणि यात्रा किंवा देवस्तान च्या ठिकाणी हे केले जातात ,किती जणांना यातून काय फायदा होतो हे अजून पर्यत काही मला समजलं नाही,आपल्या शरीरावर एक धारदार वस्तुं अडकवली जाते ,ज्या वक्ती च्या नावाने नवस केला आहे त्या वक्ती साठी,किंवा आपला नवस आहे त्या साठी ते भयंकर कुत्य केलं जातं ,यात नुसता माणूस नाही तर एकाद्या पशु चा बळी दिला जातो ,साधारण पण हे आपल्या कडील देवदेवतांच्या ठिकाणी केलं जातं 
आपण आता 21 शतकात आहे पण आपला समाज हा अजून पण जुन्या पुरण्या पद्धतीत आहे यातील बदल करून घेण्यास आपला समाज तयार नाही ,कदाचित धार्मिक गोष्टी चा पगडा असावा ,
ग्रामीण भागात तर आहेत पण शहरी भागात पण असल्या गोष्टी सर्रास पणे बगायला भेटतात,
कदाचित आपल्या समाजात शिक्षणच्या अभावामुळे जुन्या लोकांच्या डोकातुन काही विदारक गोष्टी काढून टाकणे शक्य होत नसावे,

माझ्या डोळ्याने कित्येक शिक्षित लोकांना पण अस करताना बघितलंय मी धर्माचा पगडा की फक्त पूर्वजांनी केलं मणून करतात हे देव जाणे ,पण असल्या गोष्टी आताच्या पिढी त होताय याच दुर्दैव...
लग्न होत नाही,मुलं होत नाही,अजून बरच काही या गोष्टी साठी असेल कर्मकांड केले जातात ,हे कितपत योग्य 
जेव्हा सगळी कडून अपयश येत तेव्हा लोक असल्या मार्गात जास्त अडकतात

No comments:

Post a Comment